सिद्धगडच्या रणंसंग्रामातील क्रांतीविरांना क्रांती ज्योत पेटवून दिली मानवंदना !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे शनिवारी 2 जानेवारी रोजी पहाटे 6 .10 वाजता
आमदार किसन कथोरे यांचे हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्मा विर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस दलातर्फे हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय भरत भगत, राजेंद्र ठाकरे, सिद्धगड स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी, ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, मुरबाड तालुका भाजप अध्यक्ष जयवंत सूर्यराव, मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर तेलवणें, मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, सामाजिक कार्यकर्ते दिपक खाटेघरे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे आदि उपस्थित होते.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सिद्धगड येथे मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये सुरक्षित अंतर ठेऊन हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्यातील मानिवली येथील भरत भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना भजनाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.


No comments:
Post a Comment