कल्याण तालुक्यातील वरप ग्रामपंचायत बिनविरोध जिल्ह्यात आदर्श !
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील वरप ग्रामपंचायतीने ही निवडणूक बिनविरोध करून ठाणे जिल्ह्यात एक वेगळाच आदर्श घालून दिला असून यांचे सर्व श्रेय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पंचायत समितीचे सदस्य भाऊ गोंधळे यांच्या सह सर्व उमेदवारांचे आणि ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे वरप सारखी ग्रामपंचायत जर बिनविरोध होते तर इतरांनी याचा आदर्श का घ्यावा नये अशी चर्चा तालुक्यात ऐकायला मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की घराघरात, भाऊबंदकीत भांडण लावण्याचे काम असे म्हटले जाते. काही अंशी ते खरे देखील आहे. कारण याच कारणासाठी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये हाणामा-या, पोलीस केसेस झाल्या आहेत. याला वरप ग्रामपंचायत देखील अपवाद नव्हती. गावातील कल्याण पंचायत समिती चे सदस्य तसेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊ गोंधळे यांची एकहाती सत्ता होती. त्यामुळे यावेळी वरप ग्रामपंचायतीचे निवडणूक जाहीर होताच गावात पुन्हा दोन गट निर्माण झाले. यावेळी देखील भांडण, वाद होणार असे वातावरण तयार होत होते. याला बळ मिळाले ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या १३ जागासाठी तब्बल ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे गावातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, पत्रकार, वकील, स्वतः कल्याण पंचायत समितीचे सदस्य भाऊ गोंधळे, बाका पावशे, राजेश भोईर, डॉ भगवान भोईर, रवी भोईर, हे प्रयत्न करत होते आणि आज अखेरीस यांच्या सर्वाच्या सहकार्याने व प्रयत्नातून १३ सदस्य बिनविरोध निवडून देण्यात आले. इतर ३७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने हा चमत्कार घडला आहे. नवनिर्वाचित सदस्या मध्ये एक नंबर वार्डातून राजश्री प्रकाश गोंधळे, संदिप देविदास पावशे, दोन मधून भूषण तुकाराम भोईर, दिपिका स्वप्नील भोईर, महेश गोंधळे, तीन मधून अंकुश जनार्दन भोईर, रविना भोईर, मिना नवनाथ कुर्ले, तर चार मधून कल्पना राजेश भोईर, हनुमान शांताराम भोईर, आणि सोनाली भोईर तर प्रभाग ५ मधून छाया महेंद्र भोईर, व निलेश सुरेश कडू आदी सदस्यांचा समावेश आहे त्यामुळे वरप ग्रामपंचायतीने ही निवडणूक बिनविरोध करुन ठाणे जिल्हा मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे असे माझी सभापती भरत गजानन गोंधळे यांनी अभिमानाने सांगितले. तर वरप सारखी ग्रामपंचायत बिनविरोध होते तर तालुक्यातील इतर २० ग्रामपंचायती का होत नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

No comments:
Post a Comment