विविध सामाजिक उपक्रमांनी गोवेली परिसरात शिवजयंती साजरी, पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन !
कल्याण (संजय कांबळे) : बहुजन प्रतिपालख, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती उत्सव गोवेली परिसरात विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, बहुजन प्रतिपालख, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव कल्याण तालुक्यात मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला.
वरप जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी गणेश बुनगोडे अनुष्का मुंडे जय मुंडे यांनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज उभे केले. यावेळी मुख्याध्यापिका रघुवंशी मॅडम उपस्थित होत्या. . म्हारळ, वरप, कांबा, रायते, पिंपळोली आदी ठिकाणी मशाल, मिरवणूक, प्रतिमा पूजन झाले. तर काबा येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान तर गोवेली व दहिवली येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली यांच्या वतीने शिवसंस्कार जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे टिम प्रमुख संजय कांबळे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी गोवेली रेवती ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पूजा दिपक जाधव या उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद शाळा गोवेली चे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख हरिश्चंद्र मिरकुटे यांनी प्रमुख पाहुणे संजय कांबळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच सरपंच श्रीमती पूजा दिपक जाधव, ग्रामसेवक प्रविण शेलवले यांना देखील गौरविण्यात आले.
प्रारंभी शिवप्रतिमा पूजन झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा गोवेली च्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे साजरे केले. तसेच जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले. आणि उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून मनसोक्तपणे दाद दिली.
यानंतर रक्तदान शिबीराला सुरुवात झाली. प्रथम गोवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पूजा दिपक जाधव यांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. गोवेली येथील रक्तदान शिबीर संपल्यानंतर दहीवली येथे स्वर्गीय भुषण मिरकुटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी जय हनुमान क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळी दहिवली व मित्र परिवार यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी सर जेजे महानगर रक्तपेढी भायखळा चे जनसंपर्क अधिकारी नीता डांगे, डॉ उमर पटेल, टेक्निशियन पूजा खर्डीकर, बिपीन पालकर, क्लार्क वैशाली वायदंडे, संकेत मोरे, नारायण सगस, जिप शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख हरिश्चंद्र मिरकुटे, शिक्षिका जयश्री गायकर, युवा संस्कार कार्यकर्ते नयन मिरकुटे, सुभाष मुकने आदी उपस्थित होते
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले होते.


No comments:
Post a Comment