Friday, 19 February 2021

त्याने रिक्षात साकारला शिवाजी महाराजांचा देखावा ! "असाही एक शिवप्रेमी रिक्षावाला" .

त्याने रिक्षात साकारला शिवाजी महाराजांचा देखावा !  

"असाही एक शिवप्रेमी रिक्षावाला" .


कल्याण, ऋषिकेश चौधरी - कल्याण पश्चिम भागातील बिर्ला कॉलेज परिसरात राहणाऱ्या लंकेश कोठीवाले या रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात शिवाजी महाराजांचा गडकिल्ल्याचा देखावा साकारला आहे. त्याने गडकिल्ल्याचा देखावा साकारुन शिवाजी महाराजांविषयी असलेले प्रचंड प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. त्याची रिक्षा या देखाव्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.


कोठीवाले यांचे मूळ गाव शिवनेरी किल्ल्यानजीक आहे. त्यांचे गावी येणे जाणो असते. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. कोठीवाले यांना शिवाजी महाराजांचा विषयी प्रचंड आदर आहे. ते सध्या बिर्ला कॉलेज येथील शिवकॉलनीत राहतात. ते 1996 सालापासून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुले आहे. मुले शिक्षण घेत आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी कोठीवले यांनी रिक्षात शिवाजी महाराजांच्या गडाचा देखावा साकारला आहे. लहान मुलांच्या मदतीने हा देखावा साकारण्यात आला आहे. त्यांचा हा देखावा शिवजयंती निमित्त चर्चेचा विषय ठरतो.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...