Friday 30 July 2021

पुरग्रस्त भागात वीजबिल वसूलीसाठी विद्यूत म़ंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'दादागिरी'!

पुरग्रस्त भागात वीजबिल वसूलीसाठी विद्यूत म़ंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'दादागिरी'!


कल्याण, (संजय कांबळे) : आधीच कोरोना महामारीने बेजार झालेल्या नागरिकांना आता पुराचा फटका बसला, अशा विविध संकटात सापडलेल्या पुरग्रस्त नांगरिकांना वीज बील भरा नाहितर लाईट तोडण्यात येईल असा' दम' विद्यूत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी देत असून त्यांच्या या दादागिरी विरोधात लोकामध्ये संताप पसरला आहे,

गेल्या आठवड्यात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, रायते, पावशेपाडा, खडवली, राया ओझर्ली, आदी गावांना उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या नद्यांंना आलेल्या पुराचा मोठा फटका बसलाय, हा पुर इतका भयानक होता की, कल्याण नगर मार्गावरील रायते पुल, भातसा नदीवरील खडवली, पुल आणि काळू नदीवरचा रुंदा पुल मोठ्या प्रमाणात वाहून गेला, तर म्हारळ गावातील शिवाणीनगर, गोदावरी नगर, राधाकृष्ण नगरी, आण्णासाहेब पाटील नगर, बोडकेचाळ, म्हारळ सोसायटी, तर वरप गावातील गावभाग, ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, दुर्गानगर, टाटापावर पावरहाऊस, मोरयानगर, पावशेपाडा रायते, खडवली, आदी भागातील घरात कित्येक तास पुराचे पाणी भरले होते, यामुळे शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे,

आधीच गेल्या दिड दोन वर्षांपासून कोरोना मुळे अनेकांचा जीव गेला, तर बुहुतेकांचा काम धंदा,नोकरी, व्यापार गेला आहे, त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सर्वांना पडला आहे, अशातच विद्यूत मंडळाने अव्वाच्या सव्वा बील पाठवणे सुरु केले आहे, लाँकडाऊण काळात कोणत्याही प्रकारचे मिटर रिंडिंग घेतलेले नसतानाही हजारो रुपये बील नागरिकांना पाठवले जाते आहे, यातीलही काही बील नांगरिकांनी इमानेइतबारे भरले होते, पण आता पुन्हा पुरामुळे यांचे कंबरडे मोडले आहे, जनता चारही बाजूंंनी संकटात सापडली आहे, अशा संकटाच्या वेळी विद्युत मंडळांचे अधिकारी व कर्मचारी लोकांनी लाईटबील भरा नाहीतर तूमची लाईक कट करण्यात येईल, तूमच्या वर गुन्हे दाखल करु, पुरग्रस्त आहेत तर काय झाले?बील भरावेच लागेल असे उध्दटपणे,भाषा वापरली जात आहे, त्यामुळे लोकामध्ये संताप निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे फार्म हाउस,हाँटेल,धाबे, टप-या येथे बिनदिक्कतपणे आकडे टाकून चोरीची लाईट घेऊन वापरली जाते हे यांना दिसत नाही का? उलट टिटवाळा परिसरातील धाब्यावर विद्युत मंडळांचे वरीष्ठ अधिकारी 'मधीरा' ढोसून पार्टी करत असल्याचे अनेक पत्रकारांनी पाहिले, छुप्या कँमेरात विडिओ शुट करुन ठेवले आहेत. या विरोधात आमदार कुमार आयलानी हे उर्जामत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार असूंन यामध्ये म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त भागातील सक्तीने विजबील वसूली करु नये, त्यांना सावरण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी द्यावा अशी मागणी ही करणार आहेत.

दरम्यान राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्त भागात वीजबिल वसूली करु नये असे आदेश दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले  आहे, 

प्रतिक्रिया-मी आताच उर्जा मंत्री नितीन राऊत यांना याबाबत सविस्तर पत्र पाठवणार आहे'-कुमार आयलानी, आमदार, उल्हासनगर, विधासभा.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...