राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यूदर २ टक्क्यांवर कायम !
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कोरोना बाधित रूग्णांचा आलेख वर-खाली होताना दिसत आहे. राज्यात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी ९,४८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ८८ हजार ८४१ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ वर पोहोचली आहे. आज राज्यात १५३ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. यासह आज ८,३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६% एवढे झाले आहे.

No comments:
Post a Comment