Sunday, 1 August 2021

श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांना कोरोना योध्दा म्हणून केले सन्मानित !

श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांना कोरोना योध्दा म्हणून केले सन्मानित !


टिटवाळा, उमेश जाधव -: कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता व असेल त्या परिस्थितीत आदिवासी व सर्व सामान्य लोकांच्या मदतीला धाऊन‌ जाणारे व पडेल ती मदत करणारे, मग ती शासकीय असो वा खाजगी मदत करणारे गोवेली-टिटवाळा मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांना रविवारी १ ऑगस्ट रोजी श्रमजीवी संघटनेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 
मी माझे कर्तव्य पार पाडले आले. मी काही वेगळे केले नाही. परंतु माझ्या कार्याची दखल या श्रमजीवी संघटनेने घेतली त्याबद्दल मी त्यांचा खूपच आभारी आहे. या पुढेही मी माझे कर्तव्य असेच पार पाडत राहील असे मत यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...