Saturday, 18 September 2021

मिनल गोडांबे यांना राज्यस्तरीय शिक्षक जिवनरत्न पुरस्कार प्रदान !!

मिनल गोडांबे यांना राज्यस्तरीय शिक्षक जिवनरत्न पुरस्कार प्रदान !!


टिटवाळा, उमेश जाधव -: दै. जीवनदीप वार्ता च्या वतीने राज्यस्तरीय जिवनरत्न पुरस्कार सोहळा २००१ नुकताच शनिवारी मोठ्या उत्साहात गोवेली विद्यालयात संपन्न झाला. या सोहळ्यात जिल्हा परिषद शाळा आपटी चोनच्या शिक्षिका मिनल गोडांबे यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षक जिवनरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


गोविली महाविद्यालयात नुकताच राज्यस्तरीय शिक्षक जिवनरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण जिल्हा परिषद शाळा आपटी चोन च्या अतिशय उत्साही, कामसू, प्रामाणिक, उपक्रमशील, विद्यार्थी हितदक्ष, कार्यतत्पर व आदर्श शिक्षिका मिनल गोडांबे यांना राज्यस्तरीय शिक्षक जिवनरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमाण पत्र, सन्मान चिन्ह, शाळा व तुळसीचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराने गोंडाबे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी जि.प.शाळा आपटीचोणचे मुख्याध्यापक प्रभाकर लोणे, शिक्षकवृंद, शाळा, ग्रामपंचायत,केंद्र-गोवेली वतीने जीवनदीप वार्ताचे आभार मानले जात आहेत. जीवनदीप वार्ताचे संपादक रवींद्र घोडविंदे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी मंचावर उपस्थित मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपल लांडगे, शहापूर चे आमदार दौलत दरोडासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...