Monday, 4 October 2021

वरप येथील नामांकित सेक्रेट हार्ट स्कूल विद्यार्थ्यांनी गजबजले, पुन्हा लाँकडाऊण न करण्याचे विद्यार्थीनींचे भावनिक अवाहन !!

वरप येथील नामांकित सेक्रेट हार्ट स्कूल विद्यार्थ्यांनी गजबजले, पुन्हा लाँकडाऊण न करण्याचे विद्यार्थीनींचे भावनिक अवाहन !!


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोना च्या संकटांमुळे गेली कित्येक महिने बंद असलेले कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध व नामांकित असे सेक्रेट हार्ट स्कूल आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करत शाळा व्यवस्थापनाने मुलांचे ग्रँड वेलकम केले. यावेळी भविष्यात लाँकडाऊण लाऊ नये, व त्यामुळे शाळा बंद होऊ नये असे भावनिक अवाहन शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी शासनाला केले.


कल्याण, ठाणे, नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वरप या छोट्याशा गावातील सेक्रेट हार्ट स्कूलने आपल्या मेहनत, कष्ट, चिकाटी, जिद्द आणि प्रंचड आत्मविश्वास,दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि क्रीडा क्षेत्रात अग्रस्थान पटकावले आहे. आतापर्यंत या स्कूल ला शेकडो पुरस्कार, हजारो पारितोषिके, स्मृतिचिन्ह, ट्राफी मिळालेल्या आहेत. 


ऐवढेच नव्हे तर शाळेने सामाजिक भान जपत सन २००० पासून सुरू झाल्यापासून परिसरातील नागरिकांना, गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी बांधव यांना वैद्यकीय मदत, पुरग्रस्तांना आधार, शैक्षणिक सवलत, यामध्ये ही शाळा आघाडीवर आहे, कोरोना काळात तर डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकावर औषध उपचार, रुग्णवाहिका सुविधा, उपलब्ध करुन दिली. अत्यंत संकटकाळात शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बस चालक, मावशी, या सर्वांनी ख-या अर्थाने "कोरोना योध्दे" म्हणून काम केले.


इतकेच नव्हे तर शाळेचे विद्यार्थी देखील सामाजिक कार्यात मागे राहिले नाहीत, वालधुनी नदी स्वच्छता मोहीम, उल्हास नदी बचाव मोहीम, वाढत्या प्रदूषणा विरोधात जनजागृती, बेटी बचाव, बेटी पढाव उपक्रम, आणि रस्त्यावरील खड्डे या विरोधात देखिल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अंदोलन केले होते. त्यामुळे शाळा बंद असल्याने हे सगळं थांबले होते.


ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतेच शासनाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. त्यानुसार कल्याण तालुक्यातील वरप गावातील सेक्रेट हार्ट ही शाळा सुरू करण्यात आली. या अगोदर संपूर्ण शाळा परिसर सँनिटायझर करण्यात येवून सोशलडिंस्टिंगचे पालन करता यावे म्हणजे शाळा दोन्ही शिप्ट मध्ये चालवून एका वेळी २०च विद्यार्थ्यांना बसमधून ने आण केली जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर सँनिटायझर करून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची काळजी शिक्षक व कर्मचारी वर्ग घेत आहे. तसेच २५०/३०० कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच कामावर येण्याचे धोरण  शाळा व्यवस्थापनाने अवलंबिले आहे. त्यामुळे गेली कित्येक महिने बंद असलेली सेक्रेट हार्ट शाळा आज पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजून गेली होती. अनेक दिवसांपासून शिक्षक व विद्यार्थी एकमेकापासून दूर राहिल्याने आज त्यांनी शाळेत एकच जल्लोष केला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसून येत होता. यावेळी सेक्रेट हार्ट शाळेच्या सोनिया थारवडे, रोशनी या विद्यार्थ्यांनीनी शाळा सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानून लोकांना देखील कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे व सरकारने पुन्हा लाँकडाऊण लाऊन शाळा बंद करु नये असे भावनिक अवाहन केले.

यावेळी शाळेचे सर्वेसर्वा तथा व्यवस्थापक अलंबिन अंथोनी प्राचार्या विनिता राज यांनी कोरोना नियमांचे कडक पालन करत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, बस ड्रायव्हर, मावशी यांच्या साठी विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. या प्रंसगी व्यवस्थापक अलंबिन अथोंनीसर यांना विचारले असता ते म्हणाले, शाळा व्हेरिटाईज सर्टीफिकेट अर्थात कोविड सेप्टी प्रोटोकॉल मँनेमेंट सिस्टिम, एस टिडी आय एस ओ ४५००१/२०१८ नुसार कोरोनाचा पाद्रुर्भाव थांबवून सर्वाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...