Sunday, 3 October 2021

भिवंडीत 'डिजीटल सातबारा' वाटपाचा शुभारंभ, शेतकऱ्यांना होणार त्याचा फायदा !!

भिवंडीत 'डिजीटल सातबारा' वाटपाचा शुभारंभ, शेतकऱ्यांना होणार त्याचा फायदा !!


भिवंडी, दिं,4, अरुण पाटील (कोपर) :
        भिवंडी तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा भिवंडी तालुक्यातील ग्राम सचिवालय कार्यालय पडघा येथे करण्यात आला. तसेच अपर मंडळ अधिकारी श्री. अतुल नाईक यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी सजा, पूर्णा चे तलाठी श्री. सुधाकर कामडी यांनी व मंडळ अधिकारी श्री. टाकवेकर यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी सजा काल्हेरचे श्री. बोडके व ईतर तलाठी सजेतील तलाठ्यांनी आप-आपल्या अधिकार क्षेत्रात सातबारा वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.
         यावेळी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन  करण्यात आले. शेतकऱ्यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला चागला प्रतिसाद मिळाला असून शेतकऱ्याच्या कार्यक्रम दोन महिन्या पर्यंत सुरु राहणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन "तहसीलदार श्री. अधिक पाटील" यांनी केले आहे.
        शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा सोपवायचा आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षरीने १००% सातबारा पोहचविणे या मूळ उद्देश आहे. असे यावेळी "प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे" यांनी बोलताना सांगितले.महाराष्ट्र शासनाने, महसूल विभागाने १ ऑगस्ट २०२१ पासून जो पूर्वीचा सातबारा होता. आणि जो आताचा सातबारा आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेल्या आहे. या बद्दलची  माहिती देण्यात आली तर महसूल विभागा मार्फत घरपोच सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर भिवंडी तालुक्यात ९६% संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारे  झालेले आहेत. असे 'तहसीलदार अधिक पाटील' यांनी बोलताना सांगितले.
       या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवारण करण्यात आले. यावेळी "प्रांताधिकरी बाळासाहेब वाकचौरे", "भिवंडी तहसीलदार अधिक पाटील", 'भिवंडी नायब तहसिलदार महेश चौधरी', 'जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर', 'पंचायत समिती सदस्य गुरूनाथ जाधव', 'पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर', 'सरपंच अमोल बिडवी, 'उपसरपंच अभिषेक नागावेकर', 'पडघा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश कटके', 'माजी जिल्हा परिषद  सदस्य लक्ष्मण गोष्टे', 'पडघा भातगिरणी उपसभापती  मनोहर ठाकरे', 'पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले', पडघा विभागातील तलाठी, महसुल विभागाचे कर्मचारी, पडघा विभागातील शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...