Sunday, 3 October 2021

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक !

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक !


मुंबई, प्रतिनिधि - क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आर्यन याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट व मूनमून धोमेचाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. क्रूझवर चाललेली रेव्ह पार्टी एनसीबीने उधळली होती. या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते तसेच शाहरुखचा मुलगा आर्यनसह आठ जणांन ताब्यात घेण्यात आले होते. या क्रुझवर केलेल्या कारवाईत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स, १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट व मूनमून धोमेचाला अटक करण्यात आली असून, एक दिवसाची NCB कोठडी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...