Sunday, 3 October 2021

स्त्री' लंपट सावत्र पित्याकडून दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग तक्रारीच्या भीतीने आई वर प्राणघातक हल्ला आरोपी फरार !!

'स्त्री' लंपट सावत्र पित्याकडून दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग तक्रारीच्या भीतीने आई वर प्राणघातक हल्ला आरोपी फरार !!


बदलापूर : बलात्काराच्या घटनेने मानपाडा परिसर सावरत नाही तोच पुन्हा एक पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका सावत्र पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.२ ऑक्टबर) उघडकीस आला.

याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ४८९ अ ३४५, ३२३, ५०४, ५०६, पोस्को अंतर्गत. कलम ११, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी ही तिच्या सावत्र बापाकडून होणाऱ्या जाचाला आणि अत्याचाराला कंटाळून गेली होती. पण भीती पोटी पिडीत तक्रार देण्यास घाबरत होती. मात्र तिने हिंमत करून संघटनेच्या महिला पदाधिकारी महिलेला घडलेला प्रकार सांगितला असता यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित संशयित सावत्र गुन्हा नोंद केला व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याबाबतचे आदेश देत विविध सूचना केल्या. सदर दाखल झालेल्या फिर्यादी वरून अशी माहिती मिळाली आहे की सदर आरोपी हा आदी पासून लग्न झालेला असताना देखील फिर्यादी याना खोटी माहिती देवून त्याच्या सोबत लग्न केले होते. सदर आरोपी हा फक्त गरजेपुरता पिडीत मुलीच्या आई सोबत सबंध ठेवत होता. आरोपी हा स्त्रीलंपट असल्याने त्याचे अनेक मुली व महिला सोबत सबंध असल्याचे फिर्यादी महिलेच्या निर्दशनास आल्याने फिर्यादी महिलेने आरोपी जाब विचारलं असता तू कोण माझी तुला मला विचारण्याचा अधिकार नाही या विषयावर आरोपीने फिर्यादी यास अनेक वेळा बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना दिसून येत आहे. त्यावरून फिर्यादी व आरोपी याच्यात वाद असल्याने स्त्रीलंपट आरोपीने फिर्यादी याच्या मुलीवर वासनेची नजर ठेवली आपण पिता असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने आपल्या सावत्र मुली च्या रूम मध्ये जावून तिला झोपेत अश्लील प्रकार करू लागल्याने पिडीत मुलीला जाग आली पिडीत मुलीने विरोध केला असता कोणाला सागितले तर तुला व तुझ्या आईला असिड टाकून मारून टाकेल अशी धमकी दिल्याने भीती पोटी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली नाही. 

पण आपल्या आईसोबत सतत सावत्र पिता स्त्रीलंपट असल्याने वाद करून मारहाण करत आई वर अत्याचार करत असल्याने पिडीत मुलीने झालेल्या घटनेची माहिती संघटनेच्या महिला पदाधिकारी यांना सागितले. सदर घटना उघडिस आली आहे. सदर संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला आहे. फिर्यादी ने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी हा खोटे नाटे सागून अनेक महिलांची फसवणूक करून त्याच्या सोबत शारीरिक संबंध ठेवून वापर करतो अशी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण बदनामी ला घाबरून अनेक महिलेने तक्रार देण्या पुढे येत नाही.. सदर फिर्यादी महिला आपली बदनामी करते म्हणून कट रचून सदर आरोपी हा स्त्रीलंपट उघडीस येत असल्याने आरोपीने पिडीत मुलीच्या आईचा जीवावर उठला आणि फिर्यादी महिलेला इमारती खाली बोलवून वाद करत चारचाकी गाडी महिलेच्या अंगावर घातली असता फिर्यादी महिलेने आपला बचाव केला पण दुर्देवाने सदर गाडी समोर सोसायटी मधील सफाई कामगार आल्याने  यांना दुखापत झाली. त्याचा उपचार खाजगी रुग्णालयात करण्यात आला.  पीडित मुलीच्या आईने आरोपीच्या रास लीला बाबत अनेक पुरावे पोलीस स्टेशन सादर केले आहे. सदर बदलापूर पोलीस स्टेशन येते आरोपीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए आर दोंदे करत आहेत.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...