Thursday, 14 October 2021

सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत कुविचारांच्या महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम साजरा !!

सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत कुविचारांच्या महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम साजरा !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
         गेल्या चाळीस वर्षापासून टिळक नगर साकी नाका येथील झोपडपट्टी भागात प्रगती एज्युकेशनल ट्रस्टचे सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ही संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचा मुलींचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत संस्थेच्या संस्थापक व माजी प्राचार्या सौ. पुष्करणी सुभेदार  यांच्या अथक परिश्रमातून या शिक्षण संकुलात मुलींसाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. मुली स्वावलंबी होतील याची काळजी घेतली आहे. त्याने लावलेल्या रोपांचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हा वारसा सौ. ज्योती सुभेदार मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग आणि सौ. सलोनी कुडाळकर या पुढे नेत आहेत. सध्या समाजात विकृत मनोवृत्तीतून महिलांवर अत्याचार होत आहेत या विरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने आज (दि.१४ आँक्टोंबर) शाळेतील मुलींनी महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment:

  1. Maha manav savitri bai fule nchyaa vicharaache mardan kartaana disat aahet school administration

    ReplyDelete

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...