दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण !! सर्वपक्षीय कृती समितीचा एल्गार ; "जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यत लढाई सुरूच"
तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी पनवेल येथे आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना यावेळी करण्यात आली.
सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याणमधील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रामशेठ ठाकूर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याबरोबरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची आग्रही आणि रास्त मागणी आहे. दिबांच्या जन्मदिनी म्हणजेच १३ जानेवारी रोजी भव्य भूमिपुत्र परिषद कोल्ही कोपरगाव, दत्त मंदिराजवळ (ता. पनवेल) विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment