Sunday, 9 January 2022

अखेरीस रायते येथे कल्याण तालुक्यातील कोरोना कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू, सर्वांच्या प्रयत्नांना यश !q

अखेरीस रायते येथे कल्याण तालुक्यातील कोरोना कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू, सर्वांच्या प्रयत्नांना यश !


कल्याण, (संजय कांबळे) : मुंबई, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे पेंशट मोठ्या प्रमाणात आढळून येवू लागल्याने भविष्यात खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप, कांबा या गावासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रायते ग्रामपंचायत हद्दीतील "ताबोर भवन" येथे कोरोना कोव्हिड केअर सेंटर लवकर सुरू होणार असून यासाठी कल्याण पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि प्रशासन यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाची सोय होणार आहे.


सध्या राज्यात कोरोनाचे भंयकर रुग्ण सापडू लागले आहेत, डेल्टा आणि ओमायक्राँनचे देखील पेंशट चा यामध्ये समावेश आहे. आजच्या घडीला शहरासह ग्रामीण भागात सर्दी, खोकला तापाचे प्रत्येक घरात पेशंट आहेत, अशातच ढगाळ व दमट वातावरण यामुळे याच्यात भरच पडलेली आहे, कालच तालुक्यात सुमारे ९५ कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खोणी पलावा ७९, म्हारळ ४, वरप ३, नांदप १, नवगाव १, बाळेगाव ३, खडवली २, वावेघर १, असे आहेत, तर तालुक्यात अँक्टिव रुग्णाची संख्या ८३३ इतकी आहे. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याचाच विचार करून व पाठीमागील पुर्वानुभव लक्षात घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांना साठी तालुक्यात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या कल्याण पंचायत समितीच्या मासिक बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली, अनेक खाजगी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, यांच्या इमारतीत हे सुरू करावे असा एक मतप्रवाह समोर आला, पण वाढता खर्च व इतर अडचणी, तांत्रिक बाबी यामुळे रेडिमेड व सुसज्ज अशी इमारत शोधणे सुरू झाले.


वरप येथील राधास्वामी संत्सग कोव्हिड सेंटर हे एप्रिल २०२१ मध्ये सुरू झाले होते बेड, औषधे व इतर इस्टुमेंन्ट ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इतर खर्च हा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आला होता, सुमारे १०/१५ लाखाच्या आसपास तो होता, हे कोव्हिड सेंटर सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोना कमी झाल्यावर बंद करण्यात आले होते. परंतु आता ते मिळत नसल्यामुळे इतर ठिकाणी शोध सुरू होता. कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ आणि तहसीलदार यांनी अनेक जांगाची पाहणी केली व रायते ग्रामपंचायत हद्दीतील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या 'ताबोर भवन' या इमारती ची निवड केली, या संस्थेचे फादर  मार्टिन यांनी केरळ येथून हेड आँफिस मधून परवानगी देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ यांना सांगितले. त्यामुळे लवकर येथे इतर साहित्य पाठवून कोव्हिड केअर सेंटर सुरू होईल असे सांगितले आहे. हे हाँस्पिटल सुरुवातीस १०० बेडचे असणार असून गरज वाटल्यास अजून १०० बेड वाढविण्यात येईल असे सांगण्यात आलं 

कल्याण पंचायत समितीचे, सभापती, उपसभापती भरत भोईर, सर्व सदस्य, पत्रकार आणि प्रशासनाने जाणीव पुर्वक प्रयत्न केल्याने हे शक्य झाले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे रायते येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील पेशंट ची सोय होणार आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...