Sunday, 3 April 2022

किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांचा १५ वर्षाच्या प्रोव्हिडंट फंड २ दिवसात भरणार ! काम बंद आंदोलन तहकूब ..!! *किनगाव बू. तालुका यावल.*

किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांचा १५ वर्षाच्या प्रोव्हिडंट फंड २ दिवसात भरणार ! काम बंद आंदोलन तहकूब ..!! *किनगाव बू. तालुका यावल.*


जळगाव, बातमीदार : जुलै २००१ ते मार्च २०१५ काळातील किनगाव बू. ग्राम पंचायत कर्मचारी यांचे एकूण १५ वर्षाचे प्रोव्हिडंट फंडचे थकीत रक्कम १,१०,०००/रू पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर व सरपंच निर्मलाताई पाटील यांनी याचे खात्यात जमा करण्याचा समझोता झाल्याने १ एप्रिल पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी यांनी मागे घेतला, असे जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


याबाबत सविस्तर असे की सदर समझोता यावल पंचायत समितीचे बीडिओ किशोर सपकाळे यांचे उपस्थितीत हा तोडगा काढण्यात आला. किनगाव ग्रामपंचायत कमचाऱ्यांना किमान वेतन बरोबर जानेवारी २०२० पासून ४२२५ रू राहणीमान भत्यासह देत आहे.. ! पण या तोडग्याचे वैशिष्ट्य असे की,  सेवानिवृत्त शिपाई ठाकूर यांची थकीत प्रा. फंड ची २७००० रू रक्कम आहे ती देखील निघणार आहे. 


त्यांनी ना अर्ज दिला; ना १६ कर्मचारी यांनी कधी अर्ज दिला हे देखील त्यांना माहीत नसताना त्यांना थकीत पीएफ मात्र जास्त मिळेल. १६ पैकी २ कर्मचाऱ्यांना ही थकीत पीएफ भरणेचा तोडग्याचा फायदाच होणार नाही, कारण त्यांची सेवा २०१७/२०१८ पासून सुरू झाली. तरीही खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी हे समजून घेतले ५/६ सफाई कामगार यांनी तर २०१५ मध्ये पीएफ न कापता पूर्ण पगार घेतला. तरी त्यांच्या हिश्शाची रक्कम ग्रामपंचायत त्यांचे खाती भरणार आहेत ..सर्व कर्मचारी २०१५ पर्यंत पीएफ खात्यावर आली आहेत, मागील ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायतचे नवीन कार्यकारी मंडळ मागचेच ग्रामविकास अधिकाऱ्यांचे काळातील थकीत पीएफ, बाबी पूर्ण करत आहेत. तेही किती १५ वर्षाचे..!.. कर्मचाऱ्यांचे १ एप्रिल रोजी काम बंद आंदोलनाची नोटीसचे तोडगा काढतांना सरपंच पती श्री. संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंदा महाजन श्री. किरण सोनवणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत चर्चेत भागीदारी केली. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृत महाजन यांचे बरोबर त्यावेळी कर्मचारी स्टाफ सर्व.  श्री छगन साळुंखे, प्रदीप  जोशी, सुरेश साळुंखे, नाना साहेबराव पाटील, संदीप राजू पाटील, संदीप रोहिदास पाटील, गौतम कंडारे, जगदीश कंडारे, राजू जावा आदी कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या या तोडग्यामुळे निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.. असे कर्मचारी महासंघ आयटकने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...