औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : दौलताबाद येथील निसर्गाने नटलेल्या सुंदर परिसरातील मान्यवर, उद्योजक, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांना जुनेद दुर्रानी यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली.
"ज्या शहरात शिक्षणासाठी अनेक वर्षे घालवली त्या औरंगाबाद शहरात- जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून काही करावं वाटत होते. इथे काय करता येईल, याबद्दल खूप दिवस विचार केला. त्यानंतर मला फार्महाऊस प्लॉटिंगची कल्पना सुचली. माझ्या मनातील तो विचार तो पूर्णत्वास आणायचे ठरवल्यानंतर या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करून आपण व्यवस्थितपणा, आखीवपणा आणला. ज्यामध्ये साहजिकच बाबाजानी साहेबांच मार्गदर्शन लाभले. माझे मित्र अब्दुल कदिर पटेल व इम्रोज खान यांच्यासमवेत हा प्रकल्प उभा केला.असे जुनेद दुर्रानी यांनी सांगीतले.
आपल्या स्नेहीजनांना, हितचिंतकांना, मित्रांना याविषयी माहिती देऊन इथले निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पाठवले तर निश्चितपणे त्यांच्या मनात इथे प्लॉट खरेदीचा विचार आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिल्या आहेत," असे प्रतिपादन दुर्रानी यांनी यावेळी केले.
मा. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, खा. फौजिया खान मॅडम, आ. राहुल पाटील, मा.आ. मधुसूदन केंद्रे, विनोदभैय्या पाटील व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत जुनेद दुर्रानी यांनी केले. या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प तयार करणे, हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण होताना पाहून आनंद होतो आहे असेही शेवटी दुर्रानी यांनी सांगीतले. कार्यक्रमाला औरंगाबाद येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment