औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : शहराचा मोठ्या वेगाने विस्तार होत असल्याने मूलभूत सोयीसुविधा मिळण्यास विलंब होतो. मात्र शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे केली जाईल. संभाजीनगर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
समर्थनगर येथे १ कोटी रुपये निधीतुन सिमेंट रस्ते कामांचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही कामे तांत्रिक अडचणी आल्याने थांबली होती. आगामी काळात पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण वाहिनी आणि मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जनतेला अभिप्रेत कामे करण्यासाठी आणि सेवा सुरक्षा देण्यासाठी शिवसेना तत्पर राहील, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, विभागप्रमुख विनोद बोरखडे, महिला आघाडीच्या किरण शर्मा, स्मिता जोशी, कांता गाढे, दीपा बोरखडे, शिवाजी पथ्रीकर, शाखाप्रमुख पंकज जोशी, ॲड.राजेंद्र देशमुख, मेघा देशमुख, ॲड. अविनाश देशपांडे, सुभाष पालोदकार, जितू शिंदे, पहाडे, डॉ. गिरीश सावजी, डॉ. गिरीश मोरे, अरुण मेढेकर, चित्रा मेढेकर. प्रा. मोरे, सिनेट सदस्य, योगिताताई होके, अमृता पालोदकर, बंडू पिसे, निकम, विभा विटेकर, पायघवान, चैतन्य राजूरकर, प्रदुम्म शाह, विलास धर्माधिकारी, ॲड. देवांग देशमुख, गवळी, चैतन्य अभ्यंकर, उदय मुळे, उंबरकर, खोडे, जोशी, देशपांडे, ॲड. प्रशांत निकम, डॉ. कागिनाळकर , प्रा.थोरात, पदरे, डॉ. बर्दापूरकर, डॉ.बऱ्हाळे, अजय देशमुख, मंदार देशमुख, .देशपांडे, डॉ. अनंत बीडकर, डॉ.लिंगायत, पापडिवाल, राजेंद्र गरड, सुनील गायकवाड आदींसह वॉर्डातील नागरिक, शिवसैनिक, युवासैनिक, मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

No comments:
Post a Comment