Friday, 16 September 2022

चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे ६०० गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण !!

चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे ६०० गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण !!


प्रतिनिधी - चोपडा :
देश पातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई वासरू बैल आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या तडाख्यातून माणसे बाहेर येत असताना आता लम्पी चर्मरोगाने जनावरांवर घाला घातला आहे. या रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल म्हणून रोटरी क्लब चोपडा, RCC क्लब बोरअजंटी व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ बोरअजंटी, ता. चोपडा यांच्या सहकार्याने घरोघरी जाऊन ६०० गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण शिबीर डॉ ज्ञानदेव दातीर व त्यांच्या सहकारी यांच्या मदतीने राबविण्यात आले. शिबिराला रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख स्वप्नील महाजन, चंद्रशेखर साखरे, प्रदीप पाटील, नयन महाजन, RCC अध्यक्ष श्रीकृष्ण बोरसे, ग्रामसेवक देवरे, पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...