औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०३ - डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या होणाऱ्या अधिसभा निवडणूकिसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित वंचीत बहुजन परिवर्तन पॅनल ने उमेदवारी अर्ज दाखल केला. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा प्रकाश दादाराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सदर अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अँड. पंकज बनसोड, अँड. नंदाताई गायकवाड, विनोद आघाव, नितिन फंदे, रोहित जोगदंड, भागवत बर्डे, अनिश तडवी, आणि पल्लवी खोतकर, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाय पॉइंट येथील पुतळ्यापासून ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलिमध्ये शकळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून निघालेल्या रॅलीला संबोधित करताना प्रा प्रकाश इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असुन यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष
योगेश गुलाबराव बन (पश्चिम), प्रभाकर बकले (पूर्व),
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, बहुजन महिला आघाडीच्या लताताई बामणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ तेजाद, आदी सह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी अँड नागसेन वानखडे, लोकशाहीर मेघानंद जाधव, अमरदिप वानखेडे संकेत, सागर धोडपकर, संकेत कांबळे, ऋषी कांबळे, सिद्धार्थ कांबळे, राहुल कांबळे, हर्षवर्धन कांबळे, रोहिदास जोगदंड, हर्षल खाडे, नालंदा वाकडे, प्रवीण हिरवाई, प्रकाश भालेराव, प्रकाश उजगरे, संदीप हिवराळे, संतोष आंबोरे, वाल्मीक वाघ, चंचल जगताप, जागृती वाघमारे, प्रतीक्षा शिंगाडे, विद्या दिवेकर, सूची कांबळे, आदीसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment