Thursday, 3 November 2022

भेलोशी विद्यार्थी दिवाळी फराळ वाटप मोठ्या उत्साहात संपन्न !

भेलोशी विद्यार्थी दिवाळी फराळ वाटप मोठ्या उत्साहात संपन्न !


*(ठाणे :उदय दणदणे)*
दि.०४/११/२०२२

सामजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा ,क्षेत्रात,अग्रेसर असणारं रायगड जिल्हा महाड तालुक्यातील, *भेलोशी ग्रामस्थ मंडळ, मुंबई* आणि *तन्वीष चॅरिटेबल ट्रस्ट* यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -भेलोशी येथे *" भेलोशी विद्यार्थी दिवाळी फराळ"* वाटप  कुणबी  युवा अध्यक्ष *समीरभाऊ मधुकर रेवाळे* व *विजय गणपत गोडांबे* खजिनदार कुणबी शाखा महाड पोलादपूर यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


भेलोशी ग्रामस्थ मुंबई वतीने आजवर गरजूंना धान्य वाटप, विद्यार्थी गुणगौरव, क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत कोकणातील विविध लोककलेचं प्रसार, संवर्धन करत असे विविध उपक्रम राबवत समाज बांधीलकी जपण्याचे कार्य  सातत्याने करत आहेत.

भेलोशी विद्यार्थी  दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाला काका राणे उपसरपंच , सत्यवान यादव, समीर रेवाळे- युवा अध्यक्ष कुणबी समाज,  हिराचंद पिचुर्ले, उपाध्यक्ष मुंबई मंडळ, मनोज निर्मळ, सौ कुलकर्णी मॅडम, अंगणवाडी सेविका सुषमा रहाटवळ  मॅडम, प्रमिला रेवाळे मॅडम, सोनवलकर सर, देभेसर मंगेश निर्मळ उपस्थित होते.

उपस्थितांचे व कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले असे  समीरभाऊ रेवाळे आणि विजय गोडांबे अशा सर्वांचे भेलोशी ग्रामस्थ मुंबई मंडळ अध्यक्ष श्री संतोष धारशे यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...