जळगाव, प्रतिनिधी : मंगरूळ गावात रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि आर सी सी मंगरूळ यांच्या माध्यमातून दिवाळी निमित्त १०० मोफत निर्धूर चूल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब चोपडा तर्फे मोफत निर्धूर चुल वाटप करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.उज्वलाताई अतुल ठाकरे प्रमुख पाहुणे सौ.ज्योतीताई राकेश पाटील जि प सदस्य रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष ॲड रुपेश पाटील सचिव गौरव महाले प्रकल्प प्रमुख डॉ अमोल पाटील आरसीसी अध्यक्ष प्रणय ठाकरे व रोटरी क्लबचे सदस्य व मंगरूळ गावातील आरसीसी सदस्य हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते

No comments:
Post a Comment