खाजगी सावकारांवर पुण्यात आवळला फास ! पोलिसांकडून कडक कारवाई !!
पुणे, पांडुरंग कुंभार : आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून १ लाखाच्या मोबदल्यात ४ लाखाच्या वर रुपये परत घेऊन सुध्दा आणखी पैशांची मागणी केली.रवी नरसिंग पवार (वय - ४२ रा. लक्ष्मीनगर, हडपसर, पुणे) व अशोक वसंत ठाकरे (वय- २७ रा. वैदुवाडी, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात आयपीसी 386, 387, 452, 341, महाराष्ट्र सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने मे २०१९ मध्ये रवी पवार याच्याकडून एक लाख रुपये प्रति महिना १५ टक्के व्याज दराने पैसे घेतले होते. एक लाखाच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी रवी पवार याला ३ लाख ३० रुपये रोख तर अशोक ठाकरे याला १ लाख ५६ हजार रुपये ऑनलाइन असे एकूण ४ लाख ८६ हजार रुपये दिले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे आणखी १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहितर मुलाला उचलून नेऊन त्याचे हात पाय तोडण्याची धमकी दिली. याशिवाय फिर्यादी यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोन कडे तक्रार अर्ज केला. पथकाने चौकशी करुन आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
अशीच एक घटना सिंहगड पुणे येथे नायकोडी या सावकाराने १ लाखाचे ५ लाख अशी पाचपट रक्कम मिळाली तरी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देत अडीच लाखाची मागणी केली या प्रकरणात सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय २४, शनी नगर जांभूळवाडी रोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी विपुल अरविंद सोलंकी (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे.

No comments:
Post a Comment