कमलाकर मोरे,सौ.विजया निलेश वाघमारे, ईशा ठाणेकर यांचा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्यतर्फे सन्मान
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षण, संवर्धन, शिक्षण, संशोधन, वृक्षारोपण आणि यासंबंधीची जनजागृती या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच राज्यस्तरावर पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. कमलाकर मोरे व सौ. विजया निलेश वाघमारे तसेच कर्यकरणी सदस्य ईशा ठाणेकर यांना हे सन्मानपत्र निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे संपन्न झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात मंडळाचे अध्यक्ष मान श्री. प्रमोद दादा मोरे व सखीमंच अध्यक्षा प्रिया ताई तंबोटकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.श्री. कमलाकर मोरे व सौ. विजया निलेश वाघमारे तसेच कर्यकरणी सदस्य ईशा ठाणेकर यांना हे सन्मानपत्र प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment