Sunday, 25 December 2022

उल्हासनगर येथील बिल्डरांकडून म्हारळगावातील क्रिष्णा रेसीडन्सी मधील नागरिकांची फसवणूक, टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

उल्हासनगर येथील बिल्डरांकडून म्हारळगावातील क्रिष्णा रेसीडन्सी मधील नागरिकांची फसवणूक, टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील म्हारळ गाव येथील क्रिष्णा रेसीडन्सी इमारतीत राहणाऱ्या शेकडो नागरिकांची बिर्लागेट उल्हासनगर येथे राहणाऱ्या श्री बालाजी डेव्हलपर्स चे कैलास सोनी, शंकर सोनी आदी त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली असून या सर्वाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे म्हारळ परिसरात असे अजूनही प्रकार घडले आहेत का?याचा शोध सुरू आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत उल्हासनगरातील श्री बालाजी डेव्हलपर्स च्या शंकर वरीचंद सोनी, कैलास सोनी, भवरीदेवी सोनी, कविता सोनी, दिनेश सोनी, आणि स्नेहा रिंकू जेसवाणी यांनी बांधकाम साईट सुरू केली. यावेळी श्री सोनी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी केली. होर्डिंग्ज, साईनबोर्ड, ब्राऊचर्स, यामाध्यमातून हा प्रकल्प रेरा आँथोरिटी रजिस्ट्रेशन, हिरवेगार प्रोजेक्ट, सर्व सोईयुक्त क्लबहाऊस, लँन्डस्कोप गार्डन, आकर्षक प्रवेश लाँबी, ग्रेनाईट पाय-या, सीसीटीव्ही, सिक्युरिटी केबिन, प्रत्येक फ्लॅट मध्ये इंटरकांँम सुविधा, युपीएस, व जनरेटर, प्रतिष्ठित कंपनीची लिफ्ट, टेरेस वाँटरप्रूप, अग्निशमन व शासकिय नियमावलीतील,सोलर सिस्टम, रेन हार्वेस्टिंग, फायर फायटिंग सिस्टम,कुंटूब व मानवी सुरक्षेसाठी रेफ्यूजी जागा, आदी शेकडो प्रलोभने देण्यात आली होती, तसे त्यांच्या बुकावर छापलेले होते.

यामुळे आपले स्वप्नातील घर असावे या करिता राजेश सुभाष येवलेकर यांनी सन २०१७ या क्रिष्णा रेसीडन्सी मध्ये बी विंग मधील फ्लॅट नं ४०२ हा सुमारे २३ लाख ५६ हजार ऐवढ्या किंमतीत बुक केला, या व्यतिरिक्त डेव्हलपमेंट चार्जेस, कार पार्किंग, सर्विस टँक्स, जी एस टी, स्टँम ड्युटी, नोंदणी फी, अशा पुर्ण रकमा दिल्या,परंतु आजपर्यंत इमारतीच्या सीसी व ओसी देण्यात आल्या नाहीत. याशिवाय त्यांच्या बुकामध्ये जेजे छापलेले होते, त्यांची कोणत्याही प्रकारची पुर्तता करण्यात आली नाही. ऐवढेच नाही तर मुबलक प्रमाणात पाणी नाही, ग्रामपंचयतीची पाणीपट्टी, टँक्स, भरलेला नाही, प्लान नुसार बांधकाम नाहीत,

बेकायदेशीर दुकाने गाळे काढून विकत आहे.असा आरोप राजेश येवलेकर व इतर सदनिका धारक यांनी केला असून बिल्डर ला मेन्टनस पोटी सुमारे ४ लाख ३४ हजार ६० रुपये तर डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून ७३ लक्ष रूपये सर्व रहिवाशांनी दिले आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या मनात कैलास सोनी व त्याच्या सहका-याविरोधात कमालीचा संताप निर्माण झाला आहे.दिलेली आश्वासने न पाळल्या मुळे या विरोधात राजेश येवलेकर व इतर सहकारी यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया

*जितेंद्र ठाकूर (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, टिटवाळा)
कोर्टाचे आदेश आले आहेत त्यानुसार संबंधित बिल्डरांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

*राजेश येवलेकर (तक्रारदार, रा म्हारळगाव)
मी ठरल्याप्रमाणे बिल्डर ला सर्व रक्कम दिली आहे परंतु त्यांनी त्याची आश्वासन पाळली नाहीत, माझ्या सह सर्व सदनिका धारकांची कैलास सोनी व त्यांच्या सहका-यांनी आमची फसवणूक केली आहे.*

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...