*मा.खा. चंद्रकांत खैरे यांचा सहभाग*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : महाराष्ट्रभुषण,पद्मश्री, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी औरंगाबाद येथे आयोजित महास्वच्छता अभियानात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सहभाग नोंदवला.
राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले. यात सर्वच क्षेत्रातील सुमारे ५० ते ५५ हजार सदस्य सहभागी झाले. अभियानात सदस्य फावडे, टोपले, झाडू घेऊन ७८ मार्गांवर स्वच्छता करण्यासाठी सरसावले.
अनेक भागांत साचलेला कचरा उचलण्यात आला. जमा होणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेने २९२ घंटागाड्या, १८ कॉम्पॅक्टर, १२ हायवासह ट्रॅक्टर, टिप्पर उपलब्ध करून दिले. बाहेरगावाहून आलेल्या प्रतिष्ठानच्या सदस्यांना भाग वाटून देण्यात आले होते. त्या भागातच सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू, फावडे, टोपले घेऊन सदस्य रस्त्यासह गल्लीबोळात साफसफाई करीत होते. तीन तासांत ७४८ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला.
No comments:
Post a Comment