Sunday, 25 December 2022

नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ..

नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ..

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : आज फुलंब्री येथे भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुक्याच्या वतीने सर्व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील  व माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या उपस्थितित संपन्न झाला. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांना केन्द्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आ.हरीभाऊ बागडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय औताडे , सभापती सौ अनुराधाताई चव्हाण. शिवाजी पाथ्रीकर , जितेंद्र जैस्वाल , गिरीश गाडेकर, सर्जेराव मेटे, सौ सविताताई फुके ,सौ ऐश्वर्याताई गाडेकर व भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नवनिर्वाचित सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...