संघटना बांधणीसाठी कटिबद्ध व्हा- अंबादास दानवे
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १४ : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून शिंदे गटाला समर्थन दिलेल्या गंगापूर येथील सर्व बंडखोर पदाधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर नवीन शिवसैनिकांची नियुक्त करण्याची मोहीम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हाती घेतली आहे. गंगापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहून गंगापूर तालुक्यातील कार्यकारीणीचा त्यांनी आज आढावा घेतला.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यावर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने अंबादास दानवे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतील दुफळीमुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली असून काही पदाधीकारी ठाकरे सेनेत सक्रिय असल्याचे भासवत शिंदे गटाला समर्थन देत आहेत. असे निदर्शनास आल्याने विधानपरिषद विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी तात्काळ त्यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि पदाधिकाऱ्यांना मजबूत संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केलं.
या प्रसंगी, या प्रसंगी, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, अंकुश सूंब, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, कृष्णा पाटील डोणगावकर, महिला आघाडी तालुका संघटक अर्चना ताई सोमवसे, शहर प्रमुख भाग्येष गंगवाल, महिला आघाडी शहरसंघटक राजपूत ताई, नगरसेवक विजय पानकडे, प्रकाश जैस्वाल, आबासाहेब शिरसाठ, उपशहर प्रमुख श्रीलाल गायकवाड, मा.सभापती संजय जैस्वाल, उप तालुका प्रमुख रमेश नीचीत, पोपट गाडेकर, ज्ञानेश्वर नवले, प्रकाश जैस्वाल, प्रदीप सोनावणे, बाळासाहेब चनघटे यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना, महीलाघडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment