नामांतर चळवळीच्या स्मारकावर कोरलेले नाव ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी - रमेश गायकवाड
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १४ : आजवर हजारो उद्घाटनांच्या शिळेवर नाव आले.. करोडो रुपयांची विकासकामे केली.. पण ज्या आंदोलनाने संघर्षाची मशाल पेटवली, जनसेवेची प्रेरणा जागवली ते आंदोलन कायम स्मृतीमध्ये अग्रक्रमावर राहील..
समाजाचा दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी, समानतेची तत्वे अधिक खोलवर रुजवण्यासाठी, शिक्षणावर असलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, समाजाच्या विचारधारेमध्ये परिवर्तन करण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये दिशादर्शक ठरले.
नामांतर आणि त्याचे सकारात्मक परिणाम ४० वर्षानंतर आज समाज पाहत आहे. काळाच्या पुढचा विचार करताना संघर्ष तर होणारच.. पण समानतेच्या तत्वासह घडत असलेल्या आणि उद्या घडणाऱ्या पिढ्या पाहिल्या की आपला संघर्ष फळाला आला याचे समाधान लाभते.
इतिहासाच्या पानांवर आपले नाव महान चळवळीच्या साक्षीने कोरले गेले.. यातच जीवितकार्य पूर्ण झाल्याची कृतार्थता लाभते.
No comments:
Post a Comment