सिल्लोड/अंभई, अखलाख देशमुख, दि ९ : अंभई येथे आगामी येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद अत्यंत शांततेत व उत्साहात साजरे करावे कुठल्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी कायदा व सूव्यवस्था अबाधित रहावी या करिता प्रयत्न करावे असे आवाहन अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक राजू राठोड यांनी केले. यानंतर त्यांनी ग्रामसूरक्षा यंत्रणा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अजिंठा येथे दि.१२ बुधवार रोजी ग्रामसुरक्षा योजना नोंदणी करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी हजर राहून नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी बिट जमादार निलेश सिरसकर, दामोधर गव्हाणे, जगन्नाथ जाधव, अंकुश दूतोंडे, मोसीन देशमुख, आसद मौलाना, बशीर पठाण, रितेश जैस्वाल, आकाश सूरडकर, संजय सोनवणे, सय्यद आमीर साहेब, रब्बानी शहा, फय्याज देशमूख, सज्जाद देशमुख, पो.पा. दगडु मैंद गंगाधर दांडगे, डाँ राजेंद्र खैरे, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Kaleem shaikh
ReplyDeleteFaheem shaikh
ReplyDelete