धम्म प्रबोधनी संघ प्रणित अखिल भारतीय बुद्ध विहार भारतीय महापुरुषांची जयंती निमित्त भव्य मिनी मॅरोथॉन स्पर्धा संपन्न !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
धम्म प्रबोधनी संघ प्रणित अखिल भारतीय बुद्ध विहार भारतीय महापुरुषांची जयंती निमित्त भव्य मिनी मॅरोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास आरसीएफ समूहाचे वरिष्ठ अधिकारी अश्विनजी कांबळेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याबद्दल धमप्रबोधिनी सांगा तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले. आदरणीय प्रमुख पाहुणे अश्विनजी कांबळेसाहेब यांच्याहस्ते मिनी मॅरोथॉनमध्ये विजयी झालेल्या धावपटूंचे प्रशस्तीपत्रक मेडल, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अखिल भारतीय बुद्ध विकास परिषद या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता जवाहर विद्या भवन शाळेच्या समोरच्या पटांगणामध्ये करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्ध विहार विकास परिषदेचे प्रमुख आयोजक कार्यकर्ते भाऊसाहेब वरठे, अभय प्रसाद, क्षितिजी गायकवाड, सचिन धार पवार, बाबासाहेब गायकवाड, गणेश सलवदे सर, विजय सलवदे, महादेव कांबळे (मामा) यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment