वसई तालुक्यात जिजाऊ संस्थेचा वाढता प्रतिसाद वसई तालुक्यातील सामान्य नागरीकांचा समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ संस्थेकडुन महापालिका निवडणुक लढवण्याचा निलेश सांबरेंचा निर्धार...
वसई, प्रतिनिधी : जिजाऊ संस्थेच्या वतिने वसई तालुक्यात कौटुंबिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास नागरीक कार्यकर्ते यांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला यामध्ये ग्रामिण शहरी भागातील तरूण तरूणीपांसुन वयोवृद्ध नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालघर ठाण्यासह कोकणातील 5 जिल्हामंध्ये समाजसेवेच्या क्षेत्रात मोठ काम करणारया जिजाऊ संघटनेत पालघर जिल्हातील ग्रामपंचायत नगरपरिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांमध्ये चालेल यश मिळवल आहे.
तसेच वसई तालुक्यातील खानिवडे गावातील अनेक वर्षापासुन सत्ता असलेली बहुजन विकास आघाडीला धुळ चारत एक हाती सत्ता मिळवली त्यामुळे पालघर ठाणे नंतर आता वसई तालुक्यातील राजकारणात जिजाऊची साथ राजकारणात महत्वाची मानली जात आहे.
जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरेंच्या नेतृत्वाखाली केल्या जात असलेल्या समाजसेवेला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे या निकालातुन दिसल्याच स्थानिक जाणकारांच म्हणण आहे. वसई तालुक्यात भविष्यात राजकीय पक्षांना यशाच समीकरण साकारण्यासाठी तालुक्यात जिजाऊ संघटनेची साथ घ्यावीच लागेल असेही म्हंटले आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामिण शहरी भागामध्ये शिक्षण आरोग्य व क्रिडा सांस्कृतिक यामध्ये प्राधान्याने जिजाऊ संघटना करित असलेले कामाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात जिजाऊ अनेक राजकीय पक्षांची समिकरणे बदलु शकते.
जिजाऊ करत असलेल्या कामांबाबत शिक्षण आरोग्य सेवेच्या कार्यात निष्ठेला महत्व मिळाले असुन जिल्हात जिजाऊचा आज हि निवडणुकांमध्ये नवखे उमेदवार असतानाही मतदाराने त्यांना निवडणुन दिले आहे. यावर्षी झालेल्या निवणुकांमध्ये जिजाऊ संस्थेने पालघर जिल्हात 69 सरपंच आणि 583 सदस्य एकहाती निवडुण आणले आहेत.
वसई विरार महानगरपालिकेत जिजाऊ संस्थेचा शिरकाव इतर राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा मानला जात आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था हि गेली 2 वर्षापासुन वसई तालुक्यात कार्यरत असुन शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला स्वयंरोजगार महिला सक्षमीकरण असे अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.
वसई तालुका हा फक्त नावानेच प्रसिद्ध आहे वसई तालुक्यात महानगरपालिकेचे स्वतःचे सुसज्ज असे एक हि रूग्णालय नाही सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांसाठी एक हि शाळा नाही वसई तालुक्यात लोकसंख्या झपाट्याने वाढत असुन येथिल सत्ताधारी लोप्रतिनीधी स्वतःच्या फायद्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगार पासुन वंचित ठेवले आहे हि भयानक परिस्थिती कुठे तरी थांबली पाहिजे यासाठी जिजाऊ संस्था पुढे येऊन आरोग्य शिक्षण रोजगार पाणी या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत असते.
जिजाऊ संस्था कोकणच्या 5 जिल्हामध्ये कार्यरत आहे.
जिजाऊ संस्थेचे स्वतःचे 100 खाटांचे सुसज्ज मोफत रूग्णालय आहे महिला बालकांसाठी विशेष कक्ष आहे कार्डीअँड रूग्णवाहिके सहित एक्स रे, सोनोग्राफी, डायलिसिस, इत्यादी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये कॅन्सर, हर्निया, अँपेडींज, स्टोन, यांसारख्या मोठ्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांसाठी आठ मोफत CBSC स्कुल आहेत
संपुर्ण कोकणातील गरीब वर्गातील विद्यार्थी मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोहचावेत यासाठी 40 पेक्षा जास्त MPSC / UPSC वाचनालय सुरू केली यामधुन 2500 विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्याना अधिकारी बनवण्याचे काम जिजाऊ संस्थेने केले आहे.
वसई तालुक्यात हि जिजाऊ संस्थेचा कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत असुन लोकांना जोडण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे.
मेळाव्यास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आप्पा सांबरे साहेब यांनी मार्गदर्शन केले
यावेळी महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगीताई पाटील, जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य सभापती संदेश ढोणे, मा . सभापती ज्ञानेश्वर सांबरे, सरपंच खानिवडे दिनेश परेड, उपसरपंच करूना घरत, नेव्ही ऑफीसर गणेश बाळकृष्ण पाटील, भुमिपुत्र संघटना अध्यक्ष सुशांत पाटील, मा. पंचायत समिती सदस्य आनंद पाटील, रानगाव मा. सरपंच जितेंद्र मेहर, उपसरपंच कळंब आनंद घरत, अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश बावकर, शिरवली ग्रामपंचायत गणेश भोईर, शिवनसई ग्रामपंचायत सदस्य प्रमिला जाधव, प्रकाश पाटील, प्रदीप कुडू शिवसेना नालासोपारा शहरप्रमुख समीर गोलांबडे, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, विभागप्रमुख गणेश मुनगेकर, धीरज सांबरे, सुजय जाधव, किर्ती भोईर, तालुकाप्रमुख जिजाऊ हर्षालीताई खानविलकर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment