Sunday, 9 April 2023

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मालाड आप्पा पाडा येथे मदतीचा हात !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मालाड आप्पा पाडा येथे मदतीचा हात !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
              शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मालाड आप्पा पाडा येथे सिलेंडर स्फ़ोटामुळे लागलेल्या भीषण आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात देण्यात आला.दिनांक १३ मार्च २०२३ रोजी मालाड आप्पा पाडा येथे झोपड़पट्टीला लागलेल्या भीषण आगीत या परिसरात शेकडो झोपडया जळून खाक झाल्या होत्या व तेथील रहिवाश्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे तेथील नुकसान ग्रस्त कुटुंब व रहिवासी यांच्यासाठी  मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या मार्फत "भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जन्मोत्सव अर्थात भिमोत्सव-२०२३ चे औचित्य साधून आज (रविवार दि.९) त्यांना चटई, साड्या तसेच जीवनाश्यक साहित्य,खाऊचे वाटप  करण्यात आले. 

या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी उपमहापौर श्री.सुहास वाडकर, शिवडी विधानसभा नगरसेवक मा.श्री सचिन दादा पडवळ, माजी नगरसेवक श्री.तुलसीराम शिंदे तसेच स्थानिक उपविभाग प्रमुख श्री.प्रदिप निकम, शाखा प्रमुख श्री.विजय गावडे, उपशाखा प्रमुख शिवाजी सावंत, ज्येष्ठ समाजसेविका सौ.माई सावर्डेकर, मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर, सल्लागार श्री.भरत पंडीत, कार्यकारिणी सदस्य श्री.संदीप चांदिवडे व संस्थेचे पदाधिकारी श्री.बंडू चौधरी, श्री.श्रीकांत चिंचपुरे, श्री.वसंत घडशी, श्री.संजय चव्हाण, सौ संगीता बागकर, श्री.विनायक चौधरी, श्री.राजेंद्र पेडणेकर, श्री.मंगेश धनावडे, रंगराव चौगुले हे उपस्थित होते. या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून आयोजक यांना या निमित्ताने अनेकांनी धन्यवाद देत पुढील कार्यास शुभेच्छा आहेत.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...