*रूचिता नाईक महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा*
नालासोपारा, प्रतिनिधी : महापालिका अधिकारीनी पाण्याचा पाईप लाईनचे काम करताना नियोजनबद्ध पध्दतीने काम केले नसल्यामुळे नालासोपारातील नागरीकांवर पाण्याविना उपासमारीची वेळ आली आहे. त्यात पाण्याचा टँकर व पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांकडून लुटमार सुरू आहे. ३० रू ला मिळणारा पाण्याचा बाटला चक्क ७० रू ला विकला जात आहे.
उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असतांना शहर परिसरात नागरिकांना पाणी टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. सध्या घरोघरी उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांची कामे, लग्नसराईच्या कामांची गडबड सुरू असतांना पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे महिलांचे हाल होत असतांना यामागे टँकर वाल्यांचा धंदा तेजीत करण्यासाठी हा जाणुन बुजून त्रास देण्याचे काम सुरू आहे असा आरोप रूचिता नाईक यांनी केला आहे.
तापमानाचा पारा वाढू लागला असतांना महिलांचीही डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. महिलांकडून उन्हाळी घरगुती कामांना सुरूवात झाली आहे. या कामांना पाण्याची गरज भासत असताना सध्या नालासोपारातील नागरीकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहर परिसरातील समेळगाव, सोपारागाव, छेडा नगर, पाटणकर पार्क, निळेगाव परिसरात कृत्रीम पाणी टंचाई उद्भवू लागली आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासह अतिरिक्त कामे करण्यासही अडचण येत आहेत.
पाणी पुरवठा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. परंतु, त्यांच्याकडून टोलवा टोलवीची उत्तरे दिली जात आहेत. वास्तविक या परिसराची लोकसंख्या लक्षात घेता आमदारांनी लक्ष देण महत्वाचे होते आमदारांचा सुस्तपना व प्रशासनाचा नियोजन पध्दतीचा हलगर्जीपणा यामुळे पाण्याचे हाल होत असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment