पोलीस हक्क संरक्षण संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न !
औरंगाबाद दि १० :पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या संघटने चा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी निवड करून नियुक्ती देण्याचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते विनोद अण्णा भोसले यांचे हस्ते नियुक्ती पत्र देवुन सत्कार करण्यात आला आहे. मोलाना आझाद रिसर्च सेंटर मजनू हील औरंगाबाद येथेआज दिनांक ९ एप्रिल रोजी कार्यक्रम संपन्न झाला आहे. शाहीर डॉक्टर शेषराव पठाडे यांनी पोलीस हक्क संरक्षक संघटना ची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमा साठी महिला शक्ती जास्त संख्येने उपस्थित होते. . महिलांची संघटने मध्ये मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस हक्क संरक्षण संघटना तर्फे अनेक सार्वजनिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती विनोद अण्णा भोसले यांनी दिली आहे. शेख अनीस आणि नजीम काजी यांची संघटने चे प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र या पदावर नियुक्ती करून सत्कार करण्यात आला आहे. पोलीस हक्क संरक्षण संघटना चे राष्ट्रीय सचिव अय्युब पठाण साहेब, मेजर अशोक सानप , डॉक्टर शेषराव पठाडे, डॉक्टर भारती मुरकुटे, एडव झेबा शेख बीड, शकीला पठण, लक्ष्मण भूतकर साहेब मंचा वर उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment