सिलेंडर स्फोटामुळे घर खाक झालेल्या कुटूंबीयांना वंचित बहुजन आघाडीने दिला मदतीचा हात !!
नांदेड़, अखलाख देशमुख, दि ९ : नसरतपुर येथील रहिवासी जयभीम शिरसाठ यांच्या घरात सिलेंडरचा स्फ़ोट होऊन संपुर्ण घर भस्म झाले. शिरसाठ गवंडी कामासाठी व मुले शाळेला गेलेले असताना शिरसाठ यांच्या पत्नी शेजारी नातेवाईकांना भेटायला गेले असल्याने कोणतीही जीवीत हाणी झाली नाही ही सुखद बाब असली तरी या आगीत घरातील भांडे कपड्या सह सगळ्या वस्तुच भस्म झाल्यामुळे संसार उघड्यावर आला असुन हे परिवार सध्या शेजारी असलेल्या सामाजीक कार्यकर्त्या सोनी सोनकांबळे यांच्या आश्रयाने राहत आहे.
एकीकडे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व रमजान महिण्यात सगळेजण आनंदोत्सव साजरा करत असताना शिरसाठ यांच्या कुटुंबावर केसळलेल्या संकटाच्या वेळी त्यांना सावरण्यासाठी आपुलकीचा हात देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड (उत्तर)तालुका व महानगर, नांदेड महानगर (दक्षीण) च्या समीती व फारुक अहमद मित्र परिवाराकडुन संसारोपयोगी साहित्य व नगदी वीस हजार रुपयाची आर्थीक मदत करुन सदरील घटनेमुळे झालेल्या नुक्साणाची भरपाई करण्याकरीता शासन दरबारी पाठपुरावा करण्याची जबाबदारी सुध्दा पक्षाकडून घेण्यात आली.
या वेळी पक्षाचे नांदेड (उत्तर) तालुकाध्यक्ष मुकूंद नरवाडे, नांदेड महानगर (दक्षीण) अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, नांदेड (उत्तर) महानगराध्यक्ष अयुब खान, युवा नेते विशाल येडके, अब्दुस समी, शरजील लाला, आदित्य देशमुख सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment