महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात "मशाल मोर्चा"चे आयोजन !
पुणे, अखलाख देशमुख, दि ४ : संसदेत जनतेच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी पळ काढून, दडपशाही पद्धतीने राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करून, लोकशाहीचा खून करू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात "मशाल मोर्चा"चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी मितेंद्र सिंह, सहप्रभारी प्रदीप सिंधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, सोनललक्ष्मीजी घाग, प्रशांत ओगले, प्रदेश सोशल मीडिया प्रभारी ज़ीनत शबरीन, राहुल शिरसाट - अध्यक्ष पुणे शहर युवक काँग्रेस, विजयसिंह चौधरी- प्रभारी पुणे शहर युवक काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस प्रभारी मा प्रथमेश आबनावे, पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा कौस्तुभ नवले, पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस प्रभारी मा अक्षय जैन, पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे आणि युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment