Tuesday, 4 April 2023

श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा !

श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा !

*मुख्यमंत्र्यांनी दिल्या जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा*

ठाणे, दि. ४ - महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन मुनींचे शुभआशीर्वाद घेतले, तसेच जैन बांधवांशी संवाद साधला. 

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

 समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...