Sunday, 9 April 2023

*राष्ट्रवादीची भावकी कुणाशी?* अदानी आणि अडाणीशी - मुकूंद किर्दत (आप)

*राष्ट्रवादीची भावकी कुणाशी?* अदानी आणि अडाणीशी - मुकूंद किर्दत (आप)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीच्या संदर्भामध्ये गुजरात हायकोर्टाने निर्णय देताना डिग्री जनतेस खुली करण्यास नकार देऊन ही माहिती मागणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना २५००० दंड लावला आहे. यासंदर्भामध्ये आम आदमी पार्टीने मोदी यांच्या माहिती दडवण्याला आक्षेप घेतलेला आहे. परंतु यातील मूळ मुद्याला बगल देत अजितदादा पवार यांनी ही डिग्रीची मागणी योग्य नाही असे म्हटले. 

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अनेक अवैज्ञानिक विधाने केलेली आहेत. नाल्यांमधील गॅसवर चहा तयार करणे, पावसाळ्यामध्ये ढगाआडून क्षेपणास्त्र पाठवणे म्हणजे रडारला दिसणार नाहीत, तसेच क्लायमेट चेंज अशी गोष्टच अस्तित्वात नाही अशी विधाने केलेली आहेत. त्या संदर्भात आम आदमी पार्टीने मोदी यांच्यावर टीका केली होती.

 महाराष्ट्रामध्ये सातवी पास झालेले वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेले आहे बहुजनांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस काढली होती. त्यामुळे खरा प्रश्न पुस्तकी शिक्षण हा नसून पारदर्शकता नसणे, वैज्ञानिक दृष्टिकोन नसणे यातूनचे अडाणीपण हा आहे. असे असताना विरोधीपक्ष अजितदादा यांनी भाजप पंतप्रधानांबाबत दाखवलेला दृष्टिकोन अनाकलनीय आहे.

दुसरीकडे ज्या आदानींची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी आप चे संजय सिंग यांच्या सह सर्वच विरोधी पक्षाने लावून धरली आणि त्यामुळे हा प्रश्न जनतेसमोर आला, आता ती मागणीच अर्थहीन असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्यक्षामध्ये लवासा प्रकरण, पाटबंधारे प्रकरणे आदी बाबतीमध्ये भाजपने राष्ट्रवादीबाबत नेहमीच नरमाईची भुमिका घेतली आहे. नागालँडमध्ये काहीच गरज नसताना भाजपाला पाठिंबा दिला आहे. अदानी यांच्या बारामती भेटी झालेल्या आहेत त्यामुळे अदानी संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका ही सुद्धा अशीच भाजप शी भावकी  दर्शवणारी आहे.

वृत्तांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...