निलेश सांबरे यांना “मराठा उद्योगरत्न २०२३” पुरस्कार प्रदान !
जव्हार, जितेंद्र मोरघा -
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे ‘मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने आयोजित “मराठा उद्योजक महाअधिवेशन २०२३” कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा.श्री.निलेशजी भगवान सांबरे यांना “मराठा उद्योगरत्न २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पालघरसारख्या दुर्गम क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटविणारे निलेश सांबरे यांनी आपल्या अथक परिश्रमातून उद्योग क्षेत्रात खुप मोलाची कामगिरी केली आहे. त्यांची मेहनत आणि समाजासाठी कार्य करण्याची जिद्द यामुळे त्यांनी उद्योग क्षेत्रात आपले एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. निलेश सांबेर यांची उद्योग क्षैत्रातील मोलाची कामगिरी ही अत्यंत उल्लेखनीय आणि सर्वांना प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत उद्योजकांच्या वतीने निलेश सांबरे यांना “मराठा उद्योगरत्न २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात उद्योजक .सुरेश हावरे, .पुरुषोत्तम खेडेकर, निर्मलकुमार देशमुख, डॉ.सचिन भदाने (केंद्रीय सचिव, अर्थ मंत्रालय) व .विजय घोगरे (मुख्य अभियंता, जलसंपदा) आदी मान्यवर तसेच महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment