Wednesday, 26 April 2023

म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा, आमदारांच्या हस्ते दिंव्याग, अंगणवाडी, व मागासवर्गीयांना विविध साहित्य वाटप !

म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा, आमदारांच्या हस्ते दिंव्याग, अंगणवाडी, व मागासवर्गीयांना विविध साहित्य वाटप !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग लाभार्थी, तसेच अंगणवाडी केंद्राना विविध साहित्य व मागासवर्गीय समाजाला मंडप व इतर वस्तूचे वाटप उल्हासनगर विधानसभेचे आ, कुमार आयलानी यांच्या हस्ते व शिवसेना शिंदे गटाचे, गोपाळ लांडगे, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा पहिलाच वाढदिवस असेल जो विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमाने व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून साजरा झाला. यावेळी त्यांनी एका सुंदर अश्या माहिती पुस्तके चे प्रकाशन ही पाहुण्यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमाचे  उत्कृष्ट नियोजन म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन चव्हाण  व त्यांच्या कर्मचारी  यांनी केले होते.

कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत सर्वाधिक उत्पन्न व लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे आजच्या दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग लाभार्थी यांना ५ टक्के निधी यामध्ये प्रत्येकाला ५ हजार रुपये प्रमाणे अशा एकूण ८५ लोकांना वाटप करण्यात आले. याशिवाय १० टक्के मधून महिला व बालविकास विभागाच्या १२ अंगणवाड्याना आँफिस कपाट, टेबल, वजन काटा, पाणी फिल्टर, चप्पल खुर्च्या, स्टँड, अंगणवाडी बेबी किट, आदी साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर १५ टक्के मागासवर्गीय मधून या समाजाला व मंडळाला मंडप साहित्य, आमदार व जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याशिवाय गरोदर मातांना  आहार, स्तनदा माता, यांचीही काळजी ग्रामपंचायत घेते .

आजच्या या दिवशी आमदार कुमार आयलानी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच अश्विनी देशमुख, ग्रामसेवक नितीन चव्हाण, आदीनी सरपंच सौ निलिमा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी केले,

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...