Wednesday, 3 May 2023

प्रत्येक विभागाने एक विज़न ठेवने आवश्यक - जी श्रीकांत

प्रत्येक विभागाने एक विज़न ठेवने आवश्यक - जी श्रीकांत

*ई प्रशासनावर भर द्यावा*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : आपली सेवा ,आपले कर्तव्य असे पाहिजे की नागरिकांनी आपल्याला कायम लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज एका बैठकीत केले.

जी.श्रीकांत यांनी आज सकाळी ११.०० वाजता मनपा मुख्यालय येथे प्रभारी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या कडून पदभार स्वीकारला.

त्यांनतर प्रशासक महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
आपली सेवा ,आपले कर्तव्य असे पाहिजे की नागरिकांनी आपल्याला कायम लक्षात ठेवले पाहिजे.

आपण आपल्या कार्यालयात स्मार्ट वर्क करायला लागले पाहिजे. आपण आता ई प्रशासनाकडे वळले पाहिजे. याकरिता प्रत्येक विभागाने पुढच्या पांच वर्षाचे एक व्हिजन ठेवले पाहिजे व त्याच दिशेने काम करायला पाहिजे.

आपण असे काम केले पाहिजे की दोन वर्षांनंतर नागरिकांनी मनपाकडे असलेल्या सुविधेचा सेवांची मागणी केल्यास त्या नागरिकाला त्याने ज्या ठिकाणी ज्या वेळेस सेवा मागितली असेल त्या ठिकाणी मनपा कर्मचारी ती सेवा देण्यास तत्पर असला पाहिजे असे माझे व्हिजन आहे, असे ते यावेळी म्हणाले.
 
याकरिता आपण सर्वांना बदल घडवायचा आहे.इ ऑफिस कडे वळल्यावर असे शक्य आहे. आपण सर्वांची साथ याकरिता हवी आहे.असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. 

यावेळी मा.अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रविंद्र निकम, शहर अभियंता ए.बी देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, मुख्य लेखा परीक्षक डी के हिवाळे, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...