वाडा जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न !!
▪️सेमी इंग्रजीचे 15 वर्ग सुरू करणारी शाळा
वाडा/दि.15 जून
वाडा जिल्हा परिषद शाळा वाडा क्रमांक 1 येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम गुरुवार (15 जून) रोजी उत्साहात संपन्न झाला. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून एकूण 15 तुकड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व 15 तुकड्या सेमी इंग्रजीच्या असल्याने या ठिकाणी वाडा शहर व तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असतात. या वर्षी या शाळेत इयत्ता पहिलीत 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून शाळेची एकूण पटसंख्या 600 च्या आसपास पोहोचली आहे. तर या शाळेत नर्सरी वर्ग ही सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणीही 80 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
गुरुवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी भगवान मोकाशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयेश शेलार, नगरसेविका सुचिता पाटील, वर्षा गोळे, जागृती काळण, शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ञ सदस्य नरेश डेंगाने, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाजन यांनी केले.
No comments:
Post a Comment