Thursday, 15 June 2023

मोफत पाठ्यपुस्तक वितरण व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम !!

मोफत पाठ्यपुस्तक वितरण व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम !!

चोपडा, प्रतिनिधी :
आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय माचले ता. चोपडा येथे आज दिनांक 15 जून 2023 वार गुरुवार रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे ॲड रुपेश घनश्याम पाटील लाभले त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक प्रतिनिधी म्हणून सुनील भिल हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले गायत्री मंत्र  पठण करण्यात आले. ॲड रुपेश पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री वसंत पाटील सर यांनी केले त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्री प्रवीण आबाजीराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्व इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आलीत.कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...