आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न !!
कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पुर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त राज शासनाच्या विशेष विकास तसेच आमदार निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यात प्रभाग क्रमांक १००, तिसगाव गावठाण, पुनालिंक रोड ते ओम साई रस्ता कॉंक्रीटीकरण, चिकणीपाडा येथे वारकरी दिंडी शिल्पाचे लोकार्पण, माता रमाई आंबेडकर चौक, सिध्दार्थ नगर येथे वाचनालयाचे लोकार्पण, विजयनगर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन, पुनालिंक रोड ते शुभम हाइट्स पर्यंत १५० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे या कामाचे भूमिपूजन, अशोक नगर येथे महिलांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयाचे भूमिपूजन, नानासाहेब धर्माधिकारी उद्यान- खडे गोळवली कल्याण येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन, सेंट पॉल शाळा उल्हासनगर परिसरातील गटारातून जाणाऱ्या पाईप लाईन बदली करणाऱ्या कामाचे भूमिपूजन, गुरूसंगत दरबार उल्हासनगर जवळ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, अशा एक कोटी अठ्ठावीस लाख विकास कामांचे उद्घाटन झाले.
तसेच परमानंद भक्ती पीठ मंदिर आशेळे पाडा उल्हासनगर येथे वाढदिवसानिमित्त होमहवन ५७ किलो मोतीचूर लाडू वाटप व भजन कीर्तन कार्यक्रमाला हजेरी, तसेच गाजरे हॉल, आशेळे गाव उल्हासनगर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांना भेट वस्तू वाटप तसेच तिसाई हाऊस कल्याण पूर्व येथे वृक्षवाटप अशा कार्यक्रमांना हजेरी लावली.
No comments:
Post a Comment