रविवारी दरवर्षी प्रमाणे पालवणी गोसावीवाडी येथील नवनाथ मंदिरात पुजा आरती व महाप्रसाद संपन्न !
मंडणगड, गोसाविवाडी.(प्रतिनीधी) :- गणेश नवगरे
रविवार दिनांक ११.०६.२०२३ रोजी पालवणी गोसावीवाडी येथिल नवनाथ मंदिर मध्ये नवनाथांची पुजा आरती व दरवर्षा प्रमाणे या वर्षीही भंडारा साजरा करण्यात आला. दरवर्षी मृग नक्षत्रात एका रविवारी भंडारा घालण्यात येतो. यासाठी गावातील नाथभक्तगण मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. ह्या भंडाऱ्याचे निमित्ताने तेंडुलकर कुटुंबियांनी नाथ महाराजांकडे इच्छा दर्शवली होती, त्याची परतफेड म्हणुन चांदीची नाग मूर्ती नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली. भंडाऱ्याचे निमित्ताने महाराजांना गोडाचे नैवेद्य दाखवले जाते.
त्याचप्रमाणे नाथांच्या भंडाऱ्या सोबत बाजूला असलेल्या काळकाईमाता मंदिर मध्ये देवीला राखण सुद्धा दिली जाते. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की भंडारा म्हणजे राखणं चे तिखट जेवण. पण असे नाही.
सदरील कार्यक्रमासाठी महिला पुरुष लहान मुले दरवर्षी उपस्थित राहतात. आपण सर्व सुखी समाधानी राहावे. सर्व संकटे दूर जाओ. यासाठी प्रार्थना म्हणून देवाला विनवणी यामाध्यमातून केली जाते.
No comments:
Post a Comment