राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे, सगळे आमच्या सोबतच आहेत - प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव
कल्याण, प्रतिनिधी : शहरातील विविध विकासकामांबद्दल चर्चा करण्यासाठी तसेच भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आम्ही फक्त विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत पण आम्ही आमची फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारसरणी वर चालण्याची भूमिका बदलली नाही हे स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वर आरोप केले होते, त्या संदर्भात प्रश्न विचारला असता कुणामुळे कोण सोडून गेलं याच्यापेक्षा आमच्यामुळे कोण जोडले जात असेल तर तो जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम आहोत, आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
तसेच जे आमच्यासोबत येतील त्यांना आमच्यासोबत पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सगळेच येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असे सांगून आता जे काही प्रकल्प कल्याण, मुरबाड विकासासाठी सुरू करण्यात आले आहेत ते लवकर पूर्ण होतील व या भागाच्या विकासाला चालना मिळेल यासाठी या सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे.
No comments:
Post a Comment