जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल मध्ये नालासोपारातील इक्बाल अन्सारी यांचे स्टोन ऑपरेशन मोफत....
वसई , प्रतिनिधी : नालासोपारा येथे राहणारे इक्बाल अन्सारी यांना स्टोन आजाराचा त्रास असल्याने आर्थिक परिस्थिती मुळे ऑपरेशन करण्यास अडचण येत होती.
याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला माहिती मिळताच. जिजाऊ संस्थेच्या अमित नाईक यांनी रूग्णाची भेट घेऊन माहिती घेऊन जिजाऊ संस्थेचा श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल मध्ये अँडमिट केले व मोफत स्टोन ऑपरेशन करण्यात आले....
जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी कोणत्याही रूग्णाचे आर्थिक परिस्थितीमुळे शस्रक्रीया थांबुनये यासाठी निलेश सांबरे साहेब यांनी वडिलांच्या नावाने सुसज्ज असे 130 बेडचे श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल उघडले या मध्ये कॅन्सर, हर्निया, स्टोन, अँपेडीज, मोतीबिंदु, मोफत प्रसूती यासारखे मोठे आजारांवर मोफत शस्रक्रीया होतात.
No comments:
Post a Comment