पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची वरीष्ठ अधिकां-याकडून दखल, अधिकारी कर्मचारी व सदस्य शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांकडून आभार !
कल्याण, (प्रतिनिधी) ::ठाणे जिल्ह्यात सर्वत्र अगदी नियम धाब्यावर बसवून गटारी धुमधडाक्यात साजरी होत असतानाच दुसरीकडे मात्र कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला गटारात टाकण्याची नैसर्गिक आपत्ती त्याच्यावर कोसळली, ही वार्ता तालुक्यातील संवेदनशील व समाजाभिमुख पत्रकार संजय कांबळे यांना समजतात ते तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन, शेतकऱ्यांला धीर देऊन याबाबतचे सचित्र वृत्त विविध दैनिकामधून प्रसिद्ध करताच याची दखल कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती सारिखा शेलार आणि कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी घेतली व आपापल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले. त्यामुळे शेतकऱ्यांने समाधान व्यक्त केले व पत्रकार कांबळे यांचे आभार मानले.
शनिवारी, रविवार सलग सुट्याचा दिवस आल्याने बहुतांश लोकांनी रविवारी च गटारी साजरी करण्याचा निश्चिय केला,अगदी दोन चार दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी,बंधारे, झरे, धबधबे भरभरून वाहत होते. जिल्ह्यात १४४ कलम लागू केले असताना देखील अनेक तळीरामांनी बिनधास्तपणे व धुमधडाक्यात गटारी सेलिब्रेशन सुरू केले.
हे चित्र सर्वत्र सुरू असताना कल्याण तालुक्यातील गोवेली पिंपळोली गावातील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांचे हातातोंडाशी आलेले भाजीपाला पिक आडवे झाले, भाजीपाला पिकासाठी घातलेला मांडव वादळी पावसाने कोसळला, व काकडी, गोसाळी व शिरोली, मातीमोल झाली. ही वार्ता पत्रकार संजय कांबळे यांना समजताच ते रोहणे यांच्या शेतावर जाऊन परिस्थिती पाहून त्यांना धीर दिला. व याबाबत सविस्तर सचित्र बातमी विविध दैनिकामधून तसेच सोशलमिडियायून प्रसिद्ध केले.
बातमी प्रसिद्ध होताच कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी ताबडतोब रायते तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी श्रीमती सारिखा शेलार यांनी, कृषी सहाय्यकाना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या, तर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी रायते ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास शेतावर जाऊन पाहणी करण्यास सांगितले, त्यामुळे ते सदस्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. हे सर्व इतक्या वेगाने होईल याची शेतकरी रोहणे यांना कल्पनाच नव्हती, तर हे स्वप्नात घडते की काय? असे त्यांना वाटत होते. कारण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असताना हे सर्व अधिकारी, कर्मचारी रोहणे यांच्या शेतावर येत होते.
*त्यामुळे त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांचे मनापासून आभार मानले*
तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ही धन्यवाद दिले. तर शेतकऱ्यांची तातडीने बातमी प्रसिद्ध करून शासनास याची दखल घेण्यास भाग पाडल्याबद्ल पत्रकार कांबळे यांचे तत्कालीन कृषी अधिकारी सुरेश गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष शेलार, वंचित चे किशोर पंडित, सामाजिक कार्यकर्ते संजय घारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आदींनी कौतुक केले.
.
No comments:
Post a Comment