कांचन नगरातील दूध विक्रीत्याचा मुलगा झाला पी.एस.आय. परिसरात मिरवणूक व भव्य सत्कार !!
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील कांचन नगरातील रहिवासी व घरो - घरी जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करणारे रामचंद्र बाबुराव माळी व सुनंदा रामचंद्र माळी हे पती - पत्नी दूध विक्रीचा व्यवसाय करतात त्यांचा मुलगा दीपक रामचंद्र माळी हे सन 2020 ची एम.पी.एस.सी ची परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्या दीपक माळी हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे क्लास लावलेले नसून घरीच अभ्यास करून यश संपादन केले आहे.
त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण शेठ. ला.ना विद्यालय जळगाव एस.एम.आय.टी ला सायन्स डिप्लोमा तर पुणे येथील ऑल इंडिया शिवाजी मेमोरियम येथे इंजिनियरिंग झाले आहे.दीपक माळी यांची पी.एस.आय.पदी निवड झाल्याबद्दल साईबाबा मंदिर संस्थान व श्री गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था कांचन नगर, दिपकचे मित्र परिवार मार्फत सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
वाल्मिक नगरातील हनुमान मंदिर ते कांचन नगरातील दीपक माळी यांच्या घरापर्यंत डी.जे. वर नाचत-गाजत मिरवणूक काढली त्या वेळेस काही महिलांनी दीपकचे औक्षण केले, रांगोळ्या काढल्या, पुष्प पाहले, फटाके फोडले, आणि आनंदोमय वातावरणात मिरवणूक संपन्न झाली.
दीपक माळी यांचा सत्कार नगरसेविका कांचनताई सोनवणे श्री. गुरुदत्त बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष, राजेंद्र कोळी, साईबाबा मंदिर संस्थान मार्फत पवन सैंदाणे, माजी नगरसेवक विजय वाडकर, शरद माळी, अंजु माळी, अशोक माळी, उषा माळी, अरुण माळी, संदीप माळी, पप्पू माळी, तसेच दीपकचे मित्र-परिवार व परिसरातील नागरिकांनी भव्य सत्कार केला.
वृत्तांकन - राजेंद्र कोळी (अध्यक्ष - श्री. गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था जळगाव)
No comments:
Post a Comment